शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण – शिंदे गटाचे रमेश म्हात्रे, साधना कारंडेंचा जामीन अर्ज मागे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि साधना कारंडे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायाल यात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर आरोपींच्या वकिलांनी दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज मागे घेतले. दरम्यान आता या प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.

मंगळवारी रुग्णालयातील वैद्यकीय कक्षातील सीसीटीव्ही कॅमेरा ताब्यात घेताना उपस्थित असलेल्या साक्षीदाराची न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर रमेश म्हात्रे आणि साधना कारंडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी महत्त्वाच्या साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाल्याचा तसेच रमेश म्हात्रे याच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करून जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. मात्र सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध केला. प्रकरणातील आणखी काही महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविणे बाकी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच फोनवरून धमक्या दिल्याचे पुरावे नसले तरी रुग्णालयातच तक्रारदाराला धमकावण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.