सौरभ मित्र मंडळाने रुग्णालयात फुलवला दिवाळीचा आनंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सौरभ मित्र मंडळाने यंदाची दिवाळी टाटा आणि केईएम रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत साजरी केली. यावेळी ‘अन्नमित्र’ उपक्रमांतर्गत मंडळाने 400 हून अधिक रुग्ण व गरजूंना प्रत्येकी एक किलो वजनाचे फराळाचे डबे दिले तसेच 75 गरजू महिलांना साडय़ांचे वाटप केले.

संजय शेटये यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती. उपचारांची चिंता आणि आर्थिक विवंचनेमुळे सणापासून दूर राहणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सान्वी पेडणेकर, आशालता खानोलकर, नूपुर खानोलकर, प्रल्हाद गवरे, उज्ज्वला गवरे, अशोक गोरीवले, सुलभा गोरीवले, विपुल छेडा, संजय मीना, सुनीता कोटियन, प्रसाद कोरगावकर, जोत्स्ना गुप्ते, दिलीप कदम, मनमोहन निंबाळकर, सत्तार शेख आणि कल्पना वारिया या दात्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments are closed.