गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा आणि सांस्पृतिक वैभवाचा आविष्कार घडवत गिरगावात ‘लोकपरंपरा महोत्सव’ रंगला. सांस्पृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात आयोजित केलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात मुंबईकरांना पारंपरिक लोककलांच्या बहारदार सादरीकरणाची सांस्पृतिक मेजवानी अनुभवायला मिळाली.
राज्यातील विविध लोककलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, लोककलावंतांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि नव्या पिढीपर्यंत लोकपरंपरेचा समृद्ध वारसा पोहोचावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाची सुरुवात पारंपरिक ‘नमन’ या लोककलेच्या सादरीकरणाने झाली. या उदघाटन सोहळ्याला लोककलेचे गाढे अभ्यासक सदानंद राणे, मुंबई लोककला अकादमीचे सहप्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे, लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड आणि नगरसेवक कमलाकर दळवी यावेळी उपस्थित होते. दुसऱया दिवशी ‘दादला नको गं बाई’ या लोकनाटय़ाने रसिकांचे मनोरंजन केले. त्यानंतर कोकणच्या सांस्पृतिक परंपरेचे वैशिष्टय़ असलेल्या दशावतार लोककलेच्या माध्यमातून ‘तुळशी विवाह’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, अभिनय, संगीत आणि लोककलेच्या वैशिष्टय़पूर्ण शैलीतून तुळशी विवाहाचे धार्मिक व सांस्पृतिक महात्म्य प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आले. सांस्पृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर आणि सहसंचालक श्रीराम पांडे आणि सम्यक कलांश प्रतिष्ठानचे संयोजक शशांक बामनोलकर यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
Comments are closed.