महासत्तांच्या चर्चेकडे जगाचे लक्ष; ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन यांच्यात आज बैठक
एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन फोरम अर्थात अपेकच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज चीनमध्ये दाखल झाले. या तिन्ही नेत्यांमध्ये गुरुवारी समोरासमोर चर्चा होणार असून त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
चीनमधील शेंझेन येथे 33 वी अपेक परिषद होत आहे. या परिषदेसाठी ट्रम्प आणि पुतीन पोहोचले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आतापर्यंतचा प्रोटोकॉल मोडून विमानतळावर जाऊन ट्रम्प यांचे स्वागत केले. जिनपिंग यांच्या या बदलत्या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे. शिखर परिषदेच्या निमित्ताने तिन्ही नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात रशिया युक्रेन युद्ध, इराण, आण्विक प्रतिबंध, व्यापार करार आणि एआयमुळे होणारे स्थित्यंतर यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात स्वतंत्र बैठक होणार आहे. यात रशिया व युक्रेन युद्धाबाबत वाटाघाटी अपेक्षित आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Comments are closed.