बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ चंद्रपुरात युवासेनेचे आंदोलन
शिंदे गटाच्या नेत्या शायना एन. सी. यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. प्रवक्त्या शायना एन सी यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शायना एन. सी. यांचा फोटो फाडून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यांच्या छायाचित्राचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी यावेळी दिला. या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.
Comments are closed.