भरधाव वाहनाच्या धडकेत, पट्टेरी वाघ गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूरच्या सिंदेवाही-नागभीड राज्यमार्गावर खातगाव (भेंडाळा) फाटय़ानजीक गुरुवारी दुपारी भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत पट्टेरी वाघ गंभीर जखमी झाला. रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. यात वाघाच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत शार्पशूटरच्या मदतीने वाघाला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या जेरबंद केले. त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

धडकेनंतर गंभीर जखमी झालेला वाघ रस्त्यालगतच्या झुडपात जाऊन बसला होता. त्याचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असल्याचे वन विभागाने सांगितले. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे सिंदेवाही-नागभीड राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शार्पशूटर अजय मराठे आणि त्यांच्या पथकाने खबरदारी घेत वाघाला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे जेरबंद करून उपचारासाठी रवाना केले. या बचाव मोहिमेत ‘स्वाब’ संस्थेचे यश कायरकर आणि त्यांच्या पथकानेही सहकार्य केले.

Comments are closed.