गोकुळचे दूध 6 रुपयांनी महागले, आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ
गोकुळवर आलेल्या महायुतीच्या नव्या संचालक मंडळाने ग्राहकांना पहिलाच मोठा धक्का देत म्हशीच्या दूध दरात तब्बल 6 रुपयांची तर गाईच्या दुधात 4 रुपयांची वाढ केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक दरवाढ आहे. येत्या शनिवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
गोकुळ दूध संघाला असणारी 70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्याचे संचालक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.