गद्दारांनो, थू तुमच्या तोंडावर! माफी चालणार नाही, शायना एनसीवर गुन्हा दाखल करा! बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या शहा सेनेविरोधात आंदोलन भडकले!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो जाहीरपणे फाडणाऱ्या शहा सेनेच्या विरोधात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. बाळासाहेबांच्या अपमानामुळे संतापलेले हजारो शिवसैनिक आज सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरले. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह राज्याच्या विविध भागांत जोरदार आंदोलन करण्यात आले. शायना एनसी यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या फोटोंची शिवसैनिकांनी होळी केली. त्यांचे फोटो पायाखाली तुडवले. गद्दारांनो, थू तुमच्या तोंडावर… असा संताप व्यक्त करण्यात आला. ‘बाळासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. केवळ माफी मागून चालणार नाही. शायना एनसीवर गुन्हाच दाखल झाला पाहिजे,’ अशी मागणी शिवसैनिकांनी केली.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग-अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्रपर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या मजकुराला आक्षेप घेत शिंदे गटाने हे पुस्तक फाडले. टीव्ही कॅमेऱ्यासमोर ही नौटंकी करताना शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुखांचा फोटो फाडला. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. संतप्त शिवसैनिकांनी आज शिंदे गटातील त्या टोळक्याच्या विरोधात मुंबई दणाणून सोडली. मुंबईतील दादर, लालबाग, घाटकोपर, शिवडी, सायन, मागाठाणेसह ठिकठिकाणी उग्र आंदोलन केले.
शायना एनसी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना रत्नागिरी तालुक्याच्या वतीने करण्यात आली. कणकवली तालुका शिवसेनेने शिवसेना शाखा येथे शायना एनसींच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
पश्चिम महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी उग्र आंदोलने करून शिंदे गटाचा तीव्र निषेध करण्यात आला. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी रोष व्यक्त करत मिंध्यांच्या फोटोला जोडय़ाने हाणले, काळे फासले, प्रतिमांचे दहन करून शेण फेकले.
लालबागमध्ये शायना एनसीचा फोटो जाळला
भारतमाता सिनेमागृहासमोर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शायना एनसी यांचा फोटो जाळून निषेध नोंदवला. ‘बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या ‘गद्दारांनो, थू तुमच्या तोंडावर’ अशी पोस्टर झळकावली. सरकारने फोटो फाडणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असे अजय चौधरी म्हणाले. बाळासाहेबांचा अपमान शिवसैनिक सहन करणार नाहीत, असा इशारा शिवसेना सचिव सुधीर साळवी यांनी दिला. विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, नगरसेवक अबोली खाडे, सचिन पडवळ, किरण तावडे, भारती पेडणेकर, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, जयसिंह भोसले, हणमंत हिंदोळे, गौरी चौधरी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रतीक्षा नगरमध्ये जोडय़ांनी हाणले
विभागप्रमुख प्रमोद शिंदे व विभाग संघटिका पद्मावती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शीव-कोळीवाडा प्रतीक्षा नगर येथे शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला. त्यांचे फोटोही जाळून टाकले. एकनाथ शिंदे यांच्यासह गद्दार गटाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
मागाठाणे येथे फोटो फाडले
मागाठाणे येथे शाखा क्रमांक 3 च्या वतीने शिंदे गटातील त्या टोळक्यांच्या फोटोंना शिवसैनिकांनी लाथाबुक्क्यांनी हाणले. त्यांना चपलांचा प्रसाद दिला. मागाठाणे विधानसभा संघटक रोशनी कोरे-गायकवाड, विधानसभा संघटक दादाभाऊ पानमंद, उपविधानसभा संघटक कमल चिलबे, शाखाप्रमुख बापूसाहेब गेजगे, शाखा संघटक हेमा मयेकर, शाखा समन्वयक संजय दुबे, कार्यालय प्रमुख गुलाब हेमाडे, युवासैनिक अक्षय कदम, आशीष झा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
घाटकोपर घोषणांनी दणाणले
घाटकोपर पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळ तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. शायना एनसी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विभागप्रमुख सुरेश पाटील, विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, नगरसेवक सुनील मोरे, विठ्ठल लोकरे, नगरसेविका सकीना शेख, स्वरूपा पाटील, अजित भायजे, हेमंत साळवी, विधानसभा कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी, शिक्षकेतर सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे आंदोलनात सहभागी झाले होते.
भांडुपमध्ये तीव्र निदर्शने
भांडुप येथे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शायना एनसी यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी रश्मी पहुडकर, सिद्धी जाधव, हेमलता सुकाळे खांडेकर, राजू सावंत, राजेश कदम, दिनेश जाधव यांच्यासह ईशान्य मुंबईतील शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ठाण्यात शायनाचे फोटो पायाखाली तुडवले
ठाण्यातील चिंतामणी चौकात शायना एनसी यांच्या विरोधात शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शायना एनसी यांच्यावर त्वरित कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, रेखा खोपकर, प्रदीप शिंदे, सुनील पाटील, संजय तरे, सुभाष म्हसकर, सचिन चव्हाण, राजेंद्र महाडिक, मया पाटील, राजीव शिरोडकर, स्वप्नील शिरकर, अरविंद भोईर, एकनाथ अहिरे, प्रशांत सातपुते, विनोद यादव, राजू मोरे, संजय दळवी, अमोल हिंगे, आशीष फाळके, अनिल धुमाळ, वसंत वाघमारे, महिला आघाडीच्या अॅड. आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, अनुजा पांजरी, अनिता प्रभू, ज्योती कोळी, राजश्री सुर्वे, सुप्रिया गावकर, गीता चव्हाण, रसिका सुभेदार, योगिनी चौबळ, अनिश कुरेशी, शाहीन घडियाल, कल्पना कवळे, विजय देसाई, चंद्रकांत विधाते, संतोष कवळे आदी सहभागी झाले होते.
दादरमध्ये पोलिसांची दंडेली
शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर जबरदस्त आंदोलन केले. शिंदे गटाच्या निषेधाचे फलक घेऊन सकाळीच शेकडो शिवसैनिक शिवसेना भवनासमोर जमा झाले. शायना एनसी यांच्या निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत नगरसेविका उर्मिला पांचाळ, यशवंत विचले यांच्यासह काही शिवसैनिकांनी ताब्यात घेतले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांना एका महिला पोलीस निरीक्षकाने धक्काबुक्की केली. त्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी या दडपशाहीचा निषेध केला. आमदार महेश सावंत, माजी महापौर विशाखा राऊत, नगरसेवक निशिकांत शिंदे, साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, अभय तामोरे सहभागी झाले होते.
Comments are closed.