मलेशियातील भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश बंद करण्यात आला आहे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मदुराई येथील सुब्रमण्य स्वामी मंदिर प्रशासनाला तिरुपरनकुंड्रम टेकडीवरील ‘दीपथून’ या प्राचीन दगडी स्तंभावर कार्तिक दीपप्रज्वलन करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने यावर्षी केवळ एकदाच, 24 नोव्हेंबर रोजी ही परवानगी दिली आहे. तथापि, केवळ मंदिर प्रशासन आणि अधिकृत अधिकाऱ्यांच्या मर्यादित पथकालाच दिवे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. याप्रसंगी सार्वजनिक प्रवेशास बंदी असेल. ही अनुमती देतानाच सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या काही भागांना स्थगितीही दिली आहे.

दीपथूनवर दिवे लावण्यावरून मंदिर आणि जवळच असलेल्या हजरत सुलतान सिकंदर बादशाह औलिया दर्गा यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. दीपथून दर्ग्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आहे. अनेक दशकांपासून, मंदिरातील कार्तिक दीपम टेकडीच्या खालच्या उतारावर असलेल्या दीप मंडपामध्ये प्रज्वलित केला जातो. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या दीपथून येथे दिवे लावावेत, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. तर दर्गा व्यवस्थापन खालच्या पायरीवर दिवे लावण्याच्या जुन्या परंपरेचा हवाला देत असल्यामुळे हे प्रकरण न्यायालयाच्या दरबारात पोहोचले आहे.

तिरुपरनकुंड्रम टेकडी मदुराईपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. येथे असलेले सुब्रमण्य स्वामी मंदिर भगवान मुरुगन यांना समर्पित आहे. हे भगवान मुरुगन यांच्या सहा मुख्य निवासस्थानांपैकी एक मानले जाते. हे मंदिर 6 व्या शतकातील असल्याचे मानले जाते.

Comments are closed.