शायना एनसीविरोधात आंदोलन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या शिंदे गटाविरोधात आंदोलन सुरूच आहे. शिवसेना नेते, विभागप्रमुख–आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी विलेपार्ले विधानसभेतर्फे विलेपार्ले पूर्व स्टेशनसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शायना एनसी यांच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध व्यक्त केला. विभाग संघटक रजनी मेस्त्री व विधानसभा संघटक संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाला रुपाली शिंदे, सोनाली साबे, शुभदा पाटकर, विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, चंद्रकांत पवार, समीर साबे आदी उपस्थित होते.

शिवसेना वांद्रे पूर्व विधानसभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शायना एनसी यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी शायना यांचे पोस्टर जाळत निषेध व्यक्त केला. वांद्रे पूर्व विधानसभा संघटक सदा परब, पूजा सुर्वे, विभाग संघटक रजनी मेस्त्राr, उपविभागप्रमुख शशिकांत येलमकर, राजू भूतकर, दीपिका साटम, विधानसभा समन्वयक अनिल त्रिंबककर, नगरसेवक हरी शास्त्राr, पूजा महाडेश्वर, प्रभाग समिती अध्यक्ष रोहिणी कांबळे, नगरसेविका शर्वरी परब, प्रज्ञा भूतकर, अरुण कांबळे, संतोष कदम, फारुख शेख, युवासेनेचे शेखर येलमकर, सई गवस उपस्थित होते.
Comments are closed.