माहीच्या निवृत्तीने झहीरही अवाक्!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीचा निर्णयही तितक्याच शांतपणे जाहीर केला. चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक झहीर खान यालाही धोनीचा हा निर्णय अनपेक्षित होता. मात्र माहीने आपल्या खास शैलीत एका वाक्यात निवृत्तीची बातमी सांगितली आणि झहीरलाही अवाक् केले. चेन्नई सुपर किंग्जच्या ‘युटय़ूब’ वाहिनीवरील मुलाखतीत झहीरने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, ‘आता लिलावासाठी तुला काही अतिरिक्त पैसे मिळणार आहेत,’ अशा शब्दांत धोनीने आपली भूमिका स्पष्ट केली. धोनीची निवृत्तीही त्याच्याच स्वभावाप्रमाणे शांतपणे झाली.

Comments are closed.