Pune News – बोपदेव घाटात भीषण अपघात, भरधाव टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला; तिघांचा मृत्यू
पुण्यातील बोपदेव घाटात बुधवारी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉप उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 5 ते 6 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि अन्य प्रवाशांनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला, अशी प्राथमिक माहिती मिळते. अपघातानंतर रस्त्यावर विद्यार्थ्यांचे दप्तर आणि इतर साहित्य विखुरले होते. अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघात नेमका कसा घडला? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Comments are closed.