कुर्ला उद्यान प्रकरण – अ‍ॅपल इअर बड्सच्या आधारे पोलिसांची चोरापर्यंत धडक; दादर रेल्वे पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोपाळ ते मुंबई असा पंजाब मेलने प्रवास करणाऱया एका तरुणीची बॅग धावत्या गाडीतून चोरीला गेली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पण आरोपीबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसल्याने त्याला शोधायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला. अखेर पोलिसांनी चोरलेल्या अॅपल इअर बडच्या आधारे तपास करत बडोद्याच्या छन्नी गावात सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱया समशेर खान या सराईत चोराला पकडून आणले.

मुंबईमध्ये एका पंपनीत काम करणारी व प्रभादेवी येथे राहणारी 27 वर्षीय चंचल (नाव बदललेले) ही दिवाळीच्या सुट्टीनिमित्त भोपाळ येथे कुटुंबाकडे गेली होती. तेथून ती 12 तारखेला पंजाब मेलच्या टू टायर एसीमधून प्रवास करीत असताना पहाटेच्या सुमारास तिची लॅपटॉप, अॅपलचे इअर बड्स, महागडा इअर पह्न असा किमती ऐवज असलेली बॅग चोरीला गेली. याप्रकरणी तरुणीने दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण हटकर,  सुनील चव्हाण, गणेश जगदाळे, विशाल राठोड आणि अतुल काकड या पथकाने तपास सुरू केला. नेमकी बॅग कुठे चोरीला गेली याची माहिती उपलब्ध होत नव्हती. शिवाय बॅग चोरली कोणी हे पण स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे पोलिसांपुढे आरोपीपर्यंत पोहचायचे कसे असा यक्षप्रश्न उपस्थित झाला होता. त्या बॅगेत अॅपलचे इअर बड्स असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्या बड्सच्या माध्यमातून शोध सुरू केली. सुदैवाने ते बड्स चालू स्थितीत असल्याने पोलिसांच्या ते पथ्यावर पडले. अशा पद्धतीने माग काढत असताना ते बड्स बडोदा रेल्वे स्थानकापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या छन्नी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील बांधकामाच्या ठिकाणी दाखवू लागले. मग पथकाने तेथील एका व्यवस्थापकाचा नंबर मिळवून त्याला विश्वासात घेतले व शिताफीने बोलबच्चनगिरी करून माहिती काढली. तेव्हा चंचलची चोरलेली बॅग समशेर खान या नुकत्याच कामाला लागलेल्या सुरक्षा रक्षकाकडे असल्याची माहिती समोर आली.

Comments are closed.