रात्री लघुशंकेसाठी बाहेर पडला अन् पाच फूट खोल टाकीत कोसळला, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथे उघड्या पाण्याच्या टाकीत पडून 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाह. सागर गुरमीट्टीवार (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर पडला होते. यावेळी अंधारामुळे घरासमोर असलेल्या सुमारे पाच फूट खोल उघड्या पाण्याच्या टाकीचा अंदाज न आल्याने तो थेट टाकीत कोसळला. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे पहाटे पर्यंत सागर टाकीत पडून होता. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बाब समोर आली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच सागरने नव्या घराचे बांधकाम पूर्ण केले होते. नव्या घरात सुखाचा संसार थाटण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सागरवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घरातील कर्ता पुरुष हरपल्याने गुरमीट्टीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे करंजी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.