रायगडात शिवसेनेची वज्रमूठ भक्कम; अलिबाग, पेण विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायगड जिल्ह्यात शिवसेनेची वज्रमूठ अधिक भक्कम करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. संघटनात्मक वाढीसाठी सदस्य नोंदणी, तरुणाईपर्यंत पोहोचणे, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी अलिबाग व पेण विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवण्याची शपथच सर्वांनी घेतली.

पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने अलिबाग-मुरुड आणि पेण-सुधागड या दोन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक रायगड लोकसभा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख यांसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना संजय कदम यांनी बुथ स्तरापासून तालुका पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

नियोजनबद्ध काम करणार

अलिबाग, मुरुड, पेण आणि सुधागडसह संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याबाबत बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला. सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकजुटीने, समन्वयाने आणि सक्रियतेने काम करून पक्षसंघटना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन संजय मानाजी कदम यांनी केले आहे.

Comments are closed.