Pune Firing – शिवाजीनगर न्यायालयाबाहेर तरुणावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर बुधवारी दुपारी एका तरुणावर गोळीबार करून नंतर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हे तिघेही एका खासगी बसमधून कर्नाटकला जात असताना पोलिसांनी त्यांना पुणे सोलापूर महामार्गारून अटक केली.

कुमार शिवाजी गाडे (25), हर्षद रमाकांत साबळे (24), रोहित काशिनाथ धोंगडे (22) अशी त्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी पुण्यातील मांजरी येथून कर्नाटकमधील हमनाबाद येथे जाणारी बस पकडली होती, अशी माहिती पुणे क्राईम ब्रांचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी ANI शी बोलताना दिली.

मंदार किवळेची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

Comments are closed.