आयकर अधिकारी असल्याचे सांगून पत्रकाराला दमदाटी, धक्काबुक्की; पत्रकार संघटनांसह सर्वपक्षियांची तहसीलवर धडक
आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत धाटाव औद्योगिक वसाहतीतील रोहा डाय केम कंपनीच्या आवारात काही व्यक्तींनी दै. ‘सामना’चे पत्रकार संदीप सरफळे यांना दमदाटी करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विविध पत्रकार संघटनांसह सर्वपक्षीयंनी पोलीस आणि तहसील दारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रोहा डाय केम कंपनीतील निवृत्त कामगार देवलिंग जंगम यांनी कंपनीने आपल्यावर अन्याय केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संदीप सरफळे हे कंपनीच्या गेटवर गेले होते. या वेळी काही व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी सरफळे यांना कंपनीच्या आवारात नेत दमदाटी करत धक्काबुक्की केली. यानंतर संबंधित व्यक्ती पुन्हा कंपनीत निघून गेल्या. घडलेली घटना गंभीर असल्याने विविध पत्रकार संघटनांच्या सदस्यांनी तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, सुहास खरिवले, अल्ताफ चोरडेकर, महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, दिनेश मोरे, सचिन साळुंखे, जितेंद्र जाधव, उद्धव आव्हाड, शरद जाधव, महेश बामुगडे, रघुनाथ कडू, अमोल पेणकर, दिनकर खरिवले, किरण मोरे, अक्षय जाधव, केशव म्हस्के, प्रसाद आढाव, राकेश मोरे, नितेश सकपाळ, महेश मोहिते, विश्वजीत लुमण, समीर बामुगडे, अंजूम शेट्ये या पत्रकारांसह शहरप्रमुख राजेश काफरे, शैलेश रावकर उपस्थित होते.
Comments are closed.