सरकारी कामात अडथळा; आरोपीला दोन वर्षांचा कारावास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माणगाव न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. गोरगाव पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा निकाल २५ नोव्हेंबरला माणगाव न्यायालयाने दिला. अब्दुल लतीफ उमर पालेकर (६५) असे आरोपीचे नाव आहे.

गोरगाव पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी हे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सरकारी कामकाज सुरू असताना आरोपीकडून अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी बी. आर. जाधव यांनी केला होता. माणगाव येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

Comments are closed.