माहीम गोळीबार प्रकरणातील आरोपींचा थांगपत्ता लागेना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माहीमच्या पी. सी. ज्वेलर्स दुकानावर बेछूट गोळीबार करून सटकलेल्या आरोपींचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. आरोपींनी माहीम कॉजवे येथे दुचाकी सोडल्यानंतर ते वांद्रे स्थानकात गेले तेथून ते मालाडला गेले. त्यानंतर मात्र ते कुठे बेपत्ता झाले तेच समजू शकले नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

बुधवारी संध्याकाळी माहीमच्या पी. सी. जैन ज्वेलर्स दुकानावर दुचाकीवरून आलेल्या शूटरने दोन गोळय़ा झाडल्या. त्यानंतर तेथून सटकलेल्या आरोपींनी माहीम कॉजवे येथे दुचाकी सोडली. दोघांचे हेल्मेट व जॅकेटदेखील दुचाकीवर काढून ठेवले आणि तेथून ते वांद्रे स्थानकात गेले. तेथून ते मालाडला गेले, पण त्यानंतर ते कुठे गेले हेच समजून येत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. माहीम पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा पुढील कारवाईकरिता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

Comments are closed.