खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थ

महाराष्ट्र कॅबिनेट पोर्टफोलिओ धनंजय मुंडे: महायुतीचं खातेवाटप अखेर झाल आहे. ज्या गृहखात्यावरून शेवटपर्यंत शिंदे नाराज होते. ते गृहखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थखातं कायम आहे. एकनाथ शिंदे  (मराठी) यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वजनदार खातं असून त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांकडे गेल्या वेळच्या तुलनेत कमी वजनाची खाती आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आले आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री वेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यंत्री अजित पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं धनजंय मुंडे पोस्टद्वारे म्हणाले. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असं धनंजय मुंडेंनी सांगितले.

संतोष देशमुखांच्या हत्येमुळे धनंजय मुंडे चर्चेत-

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र काल झालेल्या खातेवाटपामध्ये धनंजय मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अजित पवारांच्या मंत्र्यांना कोणती खाती ?

अजित पवार- अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क
हसन मुश्रीफ-  वैद्यकीय शिक्षण
धनंजय मुंडे- अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
अदिती तटकरे- महिला व बालविकास
माणिकराव कोकाटे- कृषी
बाबासाहेब पाटील- सहकार
नरहरी झिरवाळ- अन्न व औषध प्रशासन
दत्तात्रय भरणे- क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मकरंद जाधव- मदत आणि पुनर्वसन

राज्यमंत्री-

इंद्रनील नाईक- उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण

संबंधित बातमी:

Maharashtra Cabinet Minister Post List: महायुतीचं मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; कोणाला कोणती खाती?, संपूर्ण यादी एका क्लिकवर

अधिक पाहा..

Comments are closed.