नाशिकमध्ये भुताची अफवा, विचित्र ‘स्त्री’चे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल; एकाला मारहाण, गावात भीतीचे

नाशिक: नाशिकमधील निफाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील (Niphad nashik) काही भागांमध्ये चक्क भूत (ghost rumor) दिसल्याची अफवा परसल्याने सध्या काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा (ghost rumor) पसरली आहे, त्याचबरोबर एका वाहन चालकाला मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे आजुबाजूच्या परिसरांमध्ये भीतीची वातावरण पसरलं आहे.

शिरवाडे ते धामोरी  गावच्या रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुत दिसले आणि भुताने त्या चालकाला मारहाण केली, अशी अफवा पसरली असून गावात याबाबतची एकच चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून अफवांनी आणखीच जोर धरला आहे. व्हिडिओमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत, तर एका व्यक्तीच्या पाठीवर मारहाण केल्यानं गंभीर जखमा झाल्याचा फोटो व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अंनिसकडून नागरिकांचे प्रबोधन

या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली असून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ एडीट करण्यात आले असून कोणीतरी खोडसाळपणा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवीत असल्याचा दावा केला आहे, असं सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी येत्या अमावस्याच्या रात्री अंनिसचे पदाधिकारी गावात भेट देऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत.

एका वाहन चालकाला मारहाण

निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुत दिसले व भुताने त्या चालकाला मारहाण केली, अशी चर्चा धामोरी परीसरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. भुत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत. वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटोत दिसत आहे. त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. जगामध्ये भुत अस्तित्वात नसते. तरीही त्याची भिती दाखवली जाते कारण भुत हे मनात असते. लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे. सदरच्या फोटोचे निरक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते. सदर व्हिडिओ व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भुताची जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल. भिती वाटणार्‍या लोकांच्या मनातील भुताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा व  प्रबोधनाचा जाहिर कार्यक्रम घेणार आहे. शिवाय शाळेमधुनही विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणार आहे. त्यामुळे भुत निघाले, ही अफवा असुन रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये ,असे चांदगुडे यांनी शेवटी म्हटले आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.