स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात

शिवसेना UBT: शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये (Nagpur News) केली होती. आता संजय राऊत यांनी घोषणा केलेल्या नागपूरमध्येच ठाकरे गटात नाराजी दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नागपूर दौरा केला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली होती. मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी याबाबत संकेत दिले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे लागतात, असेही संजय राऊत या स्पष्ट केले होते. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले होते.

पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?

आता संजय राऊत यांनी घोषणा केलेल्या नागपूरमध्येच ठाकरे गटात नाराजी दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया म्हणाले की, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत चालवतात नागपूरातील जुन्या शिवसैनिकांशी चर्चा, बैठक न करता संजय राऊत यांनी स्वबळाची घोषणा का केली? बाहेर पाच पक्ष फिरून आलेल्यांना सोबत घेवून महानगरपालिका निवडूक लढली तरी पक्षाला यश मिळणार का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. तर निर्णय समन्वयाने घ्यायला हवे, स्वबळापेक्षा महाविकास आघाडीसोबत लढण्यावर नागपूरच्या शिवसैनिकांचा कल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता यावर संजय राऊत नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका

Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही…

अधिक पाहा..

Comments are closed.