महायुतीचे 237 आमदार, पण त्यांचा 288 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, जयंत पाटलांचा शेवाळेंना टोला
जयंत पाटील: येत्या 23 जानेवारीला शिवसेना मेळाव्यात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. ठाकरे गटाचे 15 तर काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मला माहिती नाही. महायुतीचे 237 आमदार आहेत. अजून 5, 50 आमदार घेऊन 288 पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे जयंत पाटील म्हणाले.
जनतेलाही अशा स्फोटांची सवय झाली : जयंत पाटील
आजच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चा झाली आहे. पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचा निर्णय झाला नाही. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. काँग्रेस व घटक पक्षांसोबत चर्चा करु असेही जयंत पाटील म्हणाले. रायगडच्या लाडक्या बहिणीवर अन्याय होत असल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी मंत्री अदिती तटकरेंना टोला लगावला.
संजय राऊत जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं
संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्याकडे तपशिलात माहिती आहे. ते जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं असतं हे आपण पाहिल्याचे जयंत पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे हे पौर्णिमेला गावी जातात. त्यांच्या स्वतःच्या गावात ते गेले की चर्चा होते असेही जयंत पाटील म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणले, आता एकनाथ शिंदे यांना संपवून नवीन उदय कोणाचा करणार? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलाय. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसला वाटत असेल उद्धव ठाकरे संपले ते कधीही संपले नाहीत. तुम्ही काँग्रेस स्वतः कडे बघा, असा पलटवार काँग्रेसवर करत जेव्हा एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी रुसले होते, तेव्हा ‘उदय’ होणार होता. दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, अशी माझी माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे जीवन आणि राजकारण आहे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
बदलापूर एन्काऊंटरबद्दल जयंत पाटलांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटरबद्दल देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. एन्काऊंटर फेकच असणार आहे. शाळा मालकाला वाचवण्यासाठी हे प्रयत्न असतील असे जयंत पाटील म्हणाले. शाळा मालकाच्या गोष्टी अक्षय शिंदेला माहिती असतील म्हणून त्याचा शेवट केला गेला असेल असे जयंत पाटील म्हणाले. एसआयटी आली पण सरकार आपल्याला यावं तेवढंच समोर आणते.सैफच्या घरात आरोपी कसा शिरला? त्याला कुठून पकडला? असा सवाल देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.