सैफवर खरंच हल्ला की अभिनय? नितेश राणेंच्या संशयावर अजित पवारांचं उत्तर, म्हणाले ‘त्यांच्या मनात
पुणे: अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) खरंच चाकू हल्ला करण्यात आला की तो फक्त अॅक्टींग करत होता? असा सवाल भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची पर्वा केली नाही, त्यांना फक्त खान कलाकारांची काळजी आहे असंही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे, याबद्दल कुठलीही संशयास्पद माहिती पुढे आली नसल्याचं म्हटलं आहे. मी राणेंशी बोलेन, पण हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेला वाव नसल्याचं अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
माध्यमांनी राणे यांनी व्यक्त केलेल्या संशयाबाबत माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा एक पालकमंत्री या नात्याने बोलत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असतं, त्यावर मी काय बोलणार. कालच नितेश राणे बंदर आणि इतर दोन विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. पण, मला याबाबत आधिक माहिती नाही, जर त्यांच्या मनात काही असेल तर त्यांनी त्या विभागाला सांगावं, मला त्यांनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्यावर काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असं अजित पवार म्हणालेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, समजा, एखाद्या पत्रकाराच्या मनात काही आलं, तर त्याचं तो बोलतो ना.. नितेश राणेंच्या मनात काही शंका असेल, तर डिपार्टमेंटला सांगावं, मीही फार तर सांगेन की असं कुणाच्या मनात शंका- कुशंका आहे, असंही पुढे अजित पवार म्हणाले. वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. तो बांगलादेशवरुन आला होता. मुंबईबद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातील लोकांनाही आहे. त्यामुळे तो आला, पण मुंबई पाहून त्याला बांगलादेशला परत जावंसं वाटलं, त्यासाठी त्याला ५० हजार रुपये हवे होते, पण मागताना त्याने एक कोटी मागितले, हे सगळं मीडियाला पोलिस खात्याने सांगितलं आहे,
आतापर्यंतच्या माहितीत तसं काही क्लू मिळालेलं नाहीये, कदाचित सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत कपडे पाहता, यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता, असं वाटलं नसेल, पण त्यांची तब्येत चांगली आहे, ते घडलंयच ना. नंतर पहाटे आमचे डिपार्टमेंट वाले त्याला तिकडे पहाटे घेऊन गेले, तू कसा वर गेलास, कुठला जिना वापरला, तिथे कुठून तू आत गेला, आतमध्ये शिरताना हे घर कोणाचं आहे माहिती होतं का, तर तो म्हणाला की मला हे घर कुणाचं माहिती नव्हतं, माला फक्त इतकंच माहिती होतं इथे श्रीमंत वर्ग राहतो हे माहिती होतं, अनेक अभिनेते-अभिनेत्री, निर्माते येथे राहतात एवढंच माहिती होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.