सिडकोच्या 26000 घरांच्या अर्जदारांची यादी कधी प्रकाशित होणार? सोडत काही दिवसांवर

नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची 26 हजार घरांच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेच्या सोडतीची प्रक्रिया अंतिम टप्प्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. सिडकोनं नवी मुंबईतील 26000 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना आणलेली. या योजनेतून लोअर इन्कम ग्रुप आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील व्यक्तींना घरांची विक्री करण्यात  येणार आहे. या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यास अनेकदा मुदतवाढ देण्यात आलेली. अखेर प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क जमा करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळं आता अर्जदारांची मसुदा यादी, अंतिम यादी आणि सोडत हे तीन टप्पे बाकी आहेत.

मसुदा यादी कधी प्रकाशित होणार?

सिडकोनं नवी मुंबईतील 26 हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. यासाठी सुरुवातीला 236 रुपये भरुन अर्जाची नोंदणी करण्यास सांगण्यात आलं होतं. सिडकोनं सुरुवातीला घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या. त्यामुळं सिडकोच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली होती. मात्र, किंमती जाहीर झाल्यानंतर नोंदणी शुल्क भरणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सिडकोनं पुन्हा मुदतवाढ दिली होती. नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर सिडकोचे एकूण 15 प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क जमा करण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला देखील मुदतवाढ दिली गेली.  बुकिंग शुल्क जमा करण्याची मुदत 31 जानेवारीला संपली. सिडकोकडून आता 3 फेब्रुवारीला अर्जदारांची मसुदा यादी जाहीर केली जाईल. यानंतर  10 फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर केली जाईल.

सोडत कधी?

सिडकोकडून 26000 घरांच्या सोडतीसाठी  15 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीला सिडकोचं घर कुणाला मिळालं आहे, हे जाहीर होईल. त्यानंतर सिडकोच्या घरासाठी पुढील प्रक्रिया सुरु होईल.

सिडकोच्या घरांच्या किमती (रुपयांमध्ये):

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )

तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो – 48. 3 लाख
Bamandongri -31. 9 लाख
खार्कोपर 2 ए, 2 बी -38.6 लाख
कळंबोली बस डेपो  – 41.9 लाख

अल्प उत्पन्न गट (एलआयजी) –

पॅनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख
खार्कोपर पूर्व – 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
खारगर स्टेशन सेक्टर वन ए- 97.2 लाखो

दरम्यान, सिडकोच्या घरांच्या किमती अधिक असल्यानं अर्जदारांनी त्यामध्ये कपात करण्याची मागणी केली होती. मात्र, सिडकोच्यावतीनं घरांच्या किमती कमी करण्यास नकार देण्यात आला होता.

इतर बातम्या :

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली…

अधिक पाहा..

Comments are closed.