लिंबू मिर्ची गंडा दोरे हे सर्व सकाळच्या भोंग्याला माहिती, दादा भुसेंचा संजय राऊतांना टोला
संजय राऊतवरील दादा भुसे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही? याचं उत्तर काळ्या जादूवाल्याने द्यावं. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्याबाबत मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजवर सर्वच मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहिले आहेत. फडणवीसही राहिले आहेत, त्यामुळे तो मुद्दा नाही. लिंबू मिर्ची गंडा दोरे हे सर्व सकाळच्या भोंग्याला माहिती आहे, असं म्हणत दादा भुसे यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
13 तारखेला नाशिकमधे एकनाथ शिंदे यांची सभा
आज आम्ही आभार दौऱ्याच्या नियोजन संदर्भात एकत्र आलो आहे जे आरोप करतात त्याचे नाव नको असेही दादा भुसे म्हणाले. नाशिकमधे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा हा 13 तारखेला होणार आहे. 13 तारखेला नाशिकमधे एकनाथ शिंदे यांची सभा देखील होणार असल्याचे भुसे म्हणाले. शिवसैनिक नोंदणी सप्ताहाची सुरवात झाली आहे. 9 तारखेला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होणार असल्याचे भुसे म्हणाले. मागील काही आठवड्यापासून नाशिकमधून अनेक माजी नगरसेवक प्रवेश करणार आहेत असंही भुसे म्हणाले. पक्षात कोणतीही गटबाजी नाही, सर्व एकत्र आहोत आणि एकजुटीने काम करत आहोत असंही दादा भुसे म्हणाले. कंत्राटदा चा विषय अनेक वर्षापासून आहे. हा आजचा किंवा एक दोन वर्षांचा विषय नाही असेही भुसे म्हणाले. सरकार पातळीवर याबाबतीत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगला पाडून त्या ठिकाणी नवीन बांधण्याचं ठरवल्याची माहिती मला मिळाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. त्यासोबतच फडणवीसांना राहायला जायला कशाची भीती वाटतेय असा सवाल राऊतांनी केला. रामदास कदम हे स्वामी रामदास नाहीयेत ज्यांचं ऐकलं पाहिजे. काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे. यासंदर्भात कोणी बोलत असेल तर अंधश्रद्धा निर्मुलन जो कायदा आहे त्यांनी कारवाई केली पाहिजे. माझा प्रश्न इतकाच होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत याचं उत्तर कदम, शिंदे किंवा भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं. फडणवीसांचं कुटुंब वर्षावर जायला का घाबरतायेत? हा साधा प्रश्न आहे. मी म्हटलं का तिथे लिंबू, मिरच्या आहेत, नाही. त्यांनी जायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे. रात्री झोपायला तयार नाहीत, असं तिकडे काय आहे, कसली भीती वाटतेय? तिकडे असं काय घडलंय किंवा घडवलंय? असा सवाल राऊतांनी केला आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.