उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी, दोन बैठका केल

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM मराठी) यांचे नाराजी कायम आहे का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM मराठी) यांनी दांडी मारली आहे. नगर विकास आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (DCM मराठी) पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे (DCM मराठी) नाराज आहेत का? अशा चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे. त्यांच्या अनुपस्थितीचा कारण अद्याप समोर आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोशल वॉर रूमची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचा कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर त्यांनी आज दोन विभागांची आढावा बैठक बोलावली होती. ती बैठक देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये नगर विकास विभागाचे आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक त्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये काय आहे असा प्रश्न विचारला जातोय.

गेल्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये देखील एकनाथ शिंदे प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक किंवा आत्ताच्या झालेल्या या बैठका यांनी त्यांची अनुपस्थिती असणं चर्चेचा विषय ठरत आहे. या महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना देखील ते न आल्याने त्यांच्यामध्ये अजूनही नाराजी आहे का? हा मोठा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शिवसेनेचे काही मंत्री नाराज आहेत. त्यामध्ये पालकमंत्री पदासाठी असलेला दावा किंवा खातेवाटपाचा प्रश्न किंवा इतर अधिकार या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत का असा सवाल समोर येतो आहे.

https://www.youtube.com/watch?v=LMOELTU_VVK

अधिक पाहा..

Comments are closed.