चालकाला आली झोपेची डूलकी अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं! अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तीन गंभीर

भंडारा अपघात बातम्या: अमरावतीकडून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या डीजे धुमाल वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर, तीन जण गंभीर जखमी झालेत. ही घटना आज (4 जानेवारी) सकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लगतच्या मोहदूला गावाजवळ घडली. मयूर मेश्राम (वय 22) असं मृतकाचं नाव असून तो मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील रहिवासी आहे.

तर, जखमींमध्ये तुषार मेश्राम, निकेश ठवकर आणि ईश्वर भेलावे असं गंभीर असलेल्यांची नावं आहेत. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील ईश्वर भेलावे यांचं शिव डीजे धुमाल आहे. अमरावती येथून रात्रीचा कार्यक्रम आटोपून पहाटेच्या सुमारास भंडाऱ्याकडं परतीचा प्रवास करत असताना चालकाला झोपेची डूलकी आली असावी आणि यात वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रक चा भीषण अपघात

दरम्यान, अशीच एक घटना वर्ध्याच्या विरुळ गावाजवळच्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. यात  ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रक मुंबई कॉरिडॉरवरून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक बॅरिगेड तोडून नागपूर कॉरिडॉरवर येत ट्रॅव्हल्सवर धडकला आहे. यात ट्रक चालक जखमी झाला असून सहा प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना पुलगाव व सावंगी येथे रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. धामणगाव, वर्धा,वेरूळ येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. आज(4 जानेवारी)  सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय.

धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर असलेली पेनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे पिके हे करपून जात आहे. दरम्यान, परिसरातील गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  तसेच जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहे. वारंवार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे पाणी प्रश्न  सोडण्याची मागणी केली. मात्र प्रश्न न सुटल्याने आणि पाणी नदीपात्रात न आल्याने परिसरातील 12 गावातील शेतकऱ्यांनी नदी पात्रात आमरण उपोषणला बसले आहे. पाणी जो पर्यत सोडत नाही तोपर्यंत आमरण उपोषण न सोडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.