दिल्लीचा निकाल येताच मोदींकडून अण्णा हजारेंचा उल्लेख, भर भाषणात आपचे टोचले कान
नरेंद्र मोदी, दिल्ली: “मी आज वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीमान अण्णा हजारे यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदा वाल्यांची पीडा झेलत होते. आज अण्णा हजारे यांना यापासून मुक्ती मिळाली आहे. ज्या पार्टीच्या जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सभा घेऊन मोदींनी जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाच विजय झालाय. अराजकता, अहंकार आणि आपदाचचा पराभव झालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र केलेल्या मेहनतीमुळे हा विजय झालाय. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या विजयाचा शुभेच्छा देतो. दिल्लीतील जनतेने ‘आप’दा मुक्त केलं, डबल इंजिन सरकार डबल विकास करणार, असं आश्वासनही नरेंद्र मोदी यांनी दिलं.
पासून बोलणे @Bjp4india मुख्यालय. https://t.co/fjzmhw8nhy
– नरेंद्र मोदी (@narendramodi) 8 फेब्रुवारी, 2025
राजकारणात शॉर्टकटला, खोटेपणाला कोणतेही जागा नाही – नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले, राजकारणात शॉर्टकटला, खोटेपणाला कोणतेही जागा नाही. जनतेने शॉर्टवाल्या राजकारणाचा शॉर्टसर्किट केलाय. मित्रानो दिल्लीतील जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत मला कधीही निराश केलं नाही. 2014, 2019, 2024 तिन्ही निवडणुकीत दिल्लीतील लोकांनी भाजपला 7 च्या 7 जागांवर विजय मिळवून दिला. तीन-तीन वेळेस लोकसभेला शतप्रतिशत विजय मिळवून दिल्यानंतर मी पाहात होतो. दिल्लीतील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. ही अस्वस्थता दिल्लीतील लोकांची सेवा न करता आल्यामुळे होती. मात्र, दिल्लीने आता आमचा आग्रह मान्य केलाय. 21 व्या शतकात पहिल्यांदा जन्मलेले युवा भाजपचं सुशासन पाहतील. भाजपच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा विश्वास आहे.
पासून बोलणे @Bjp4india मुख्यालय. https://t.co/fjzmhw8nhy
– नरेंद्र मोदी (@narendramodi) 8 फेब्रुवारी, 2025
विविधता असलेल्या दिल्लीने आज भाजपला आशीर्वाद दिलाय – नरेंद्र मोदी
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणामध्ये आम्ही विक्रम केला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा विक्रम केला. आता दिल्लीत देखील नवा इतिहास रचलाय. मित्रानो आजच्या निकालाची आणखी एक बाजू आहे. आपली दिल्ली केवळ एक शहर नाही. हे मिनी हिंदूस्तान आहे. हा लघू भारत आहे. दिल्ली एक भारत, श्रेष्ठ भारतचा विचार घेऊन पुढे जाते. दिल्लीत दक्षिण , उत्तर, पूर्व, आणि सर्व भागातील लोक आहेत. हे एक लघू रुप आहे. याच विविधता असलेल्या दिल्लीने आज भाजपला आशीर्वाद दिलाय. दिल्लीत कोणताच भाग नाही, जिथे कमळ फुललेलं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.