चोरीच्या पैशातून लक्झरी लाईफ; पापं धुण्यासाठी गंगेत स्नान; पण प्रयागराजहून परतातच थेट तुरुंगात

नागपूर क्राइम न्यूज: घरफोडी आणि चोरीच्या पैशातून लक्झरी लाईफ जगणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला अटक करण्यात नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांना यश आलं आहे. त्याच्यावर आतापर्यंत पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. महत्त्वाचं म्हणजे घरफोड्या करून मिळालेल्या पैशातून तो एप्पल सारखा मोबाईल, ब्रॅण्डेड कपडे आणि कार सुद्धा वागवत होता. एवढंच नाही तर नागपुरात त्याने आलिशान फ्लॅट किरायाने ही घेतला होता. मात्र आता त्याचा भांडा फुटला असून पोलिसांनी (Nagpur Police) त्याला बेड्या ठोकल्या आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, रजनीकांत केशव चानोरे हा 24 वर्षांचा युवक आहे. मात्र घरफोडी आणि चोऱ्या (Crime News) करण्यामध्ये तो पटाईत असून तो वाईट कॉलर चोरटा आसल्याचे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साधारणता त्याचे टार्गेट असायचं ते म्हणजे ज्या घरामध्ये लग्न आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने सगळे हॉलमध्ये जातात त्याची तो रेकी करायचा आणि नंतर त्या घरामध्ये घरफोडी करून सगळा मुद्देमाल लंपास करायचा.

पापं धुण्यासाठी गंगेत स्नान; मात्र प्रयागराजहून परतातच थेट पोहचला तुरुंगात

दरम्यान, रजनीकांत नावाचा हा चोरटा तेवढाच धार्मिक असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे. त्याने चोरीच्या पैशातूनच कुंभमेळ्यालाही तो जाऊन आला. त्या ठिकाणी त्याने हजेरी लावली. मूळचा भंडारा जिल्ह्यातील हा रहिवासी असून त्याने नागपुरात आपलं बस्तान मांडलं. त्यासाठी त्याने एक किरायाचा फ्लॅट सुद्धा भाड्याने घेतला. एवढेच नाही तर तो कार वापरायचा, ब्रांडेड कपडे घालायचा, स्टायलिश राहणं त्याला आवडत असल्याने त्यासाठी तो घरफोड्या आणि चोऱ्या करायचा. बारावीपर्यंत त्याचा शिक्षण झालं असल तरी त्याला रस मात्र चोऱ्या करून पैसे मिळवण्यात होता. यातूनच त्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड सारख्या राज्यांमध्ये सुद्धा जाऊन चोऱ्या केल्या. त्याच्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर अशा विविध ठिकाणी 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता याच्यासोबत आणखी कोणी होतं की? हा एकटाच हे कारणामे करायचा का? याचा शोध घेत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.