मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा हवेतच यू टर्न, लँडिंगनंतर ऋषिराज सावंतला समजलं, बँकॉक नव्हे पुण्या
शियान सोयिराज शायंत गहाळ करण्यासाठी शोध परिणामः माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत (Rushiraj Sawant) यांचं काल (10 फेब्रुवारी) अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र काहीवेळेनंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती समोर आली.
ऋषिराज सावंत (Rushiraj Sawant) पुण्यातुन बॅंकॉकला जायला निघाला. मात्र तानाजी सावंतांनी त्यांच्या राजकीय संबंधांचा वापर करुन त्याला परत आणायच ठरवलं . केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यामध्ये महत्वाची भुमिका निभावली, अशी माहिती समोर आली आहे.
बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो-
मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सुत्रे हलली आणि पायलटला माघारी फीरण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषिराज सावंतचं खाजगी विमानने मग हवेतुनच युटर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषिराज सावंत कळालं की, आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत. दरम्यान, ऋषिराज सावंतसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंतसोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते.
आमदार तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत काय म्हणाले?
आमदार तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे. काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली होती. नंतर आम्हाला कळालं की, तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला आहे, अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली आहे.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.