परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई, कैलास फडवर गुन्हा दाखल

माधव जाधव कैलाश फड: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या मतदानादरम्यान (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते माधव जाधव (Madhav Jadhav) यांना मारहाण प्रकरणी अखेर कैलास फडच्या (Kailash Phad) विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी यापूर्वीच कैलास फडला अटक सुद्धा झाली होती. कैलास फड हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा कार्यकर्ता आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यादरम्यान मतदानादिवशी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली होती. मारहाण झाल्यानंतर माधव जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रार नोंदवली होती. याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला. त्यानुसार कैलास फडच्या विरोधामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा नोंदवण्यास एवढा विलंब का?

20 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना ही मारहाण झाली होती. या प्रकरणाची त्यांनी तक्रार देखील केली. मात्र गुन्हा नोंदवण्यास एवढा विलंब का लावला? असा सवाल देखील उपस्थित केला जातो आहे.

नेमकी घटना काय?

विधानसभा निवडणुक 2024 च्या मतदानादरम्यान परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली. माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्राची तोडफोड केली होती.

बीड जिल्ह्यातील 310 शस्त्र प्रमाणे रद्द-

बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक शस्त्र परवान्यांपैकी आतापर्यंत 310 जणांचे शस्त्र परवाने हे रद्द करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1281 इतके शस्त्र प्रमाणे आहेत मात्र ज्या व्यक्ती वरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्या व्यक्तीकडील पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता आणि त्याची कारवाई मागच्या एक महिन्यापासून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण परवानाधारक पिस्तूल चा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या 25% परवाने हे रद्द झाले आहेत.

संबंधित बातमी:

मराठी: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया

अधिक पाहा..

Comments are closed.