अजित पवारांनी परळीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, बोगस विकासकामांबाबत कार

अंडी बातम्या: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर (Santosh Deshmukh Case) बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांनी चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडचे पालकत्व स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच डीपीडीसी (Beed DPDC) बैठकीत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या परळीत बोगस कामे करून 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. याच अनुषंगाने मागील दोन वर्षांतील निधीच्या वितरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. आता अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला. निधी वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन समितीची बैठक होताच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे.

बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग

बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीत तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत करण्यात आली असून मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यतेची चौकशी करण्यासाठी गठीत पथकाद्वारे बीडमधील मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याबाबत चौकशी केली जात आहे. बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावून घेतलं

याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. चिंचाने यांना कागदपत्रांसह मुंबईच्या कार्यालयात अजित पवारांनी बोलावले आहे. चौकशीत प्रामुख्याने नाविन्यपूर्ण हेडमधून शाळा आणि अंगणवाड्यांना साहित्य पुरवण्याच्या कामात मोठी अनियमितता समोर आली आहे. अजित पवार स्वतः याबाबत आढावा घेणार आहेत. ही चौकशी समिती अजित पवारांना काय अहवाल सादर करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कापूस साठवणूक बॅग खरेदीत टेंडरपूर्वीच रेट फिक्सिंग? घोट्याळ्याची माहिती धनंजय मुंडेंना आधीच दिली, पण..; तक्रारकर्त्याने सगळंच सांगितलं

Cotton Bag Scam: सरकारचा जीआर निघण्यापूर्वीच कापूस साठवणूक बॅगांचे दर ठरले, संशयाची सुई पुन्हा धनंजय मुंडेंकडे

अधिक पाहा..

Comments are closed.