90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, प

संजय राऊतवरील चंद्रशेखर बारवान: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawawr) यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सोहळ्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने उघड नाराजी व्यक्त केली आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, असे म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केलाय. यावरून महाविकास आघाडी वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावलाय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीच नाही. एखाद्या पुरस्काराची निवड करणे आणि सत्कार करणे ही संस्कृती आहे. संजय राऊत शरद पवार यांना सल्ले द्यायला लागला आहे, ते सल्ला घेतील का? राऊत का चिडचिड करत आहे माहिती नाही.  राऊतांची उंचीच नाही, त्यांनी एक तरी निवडणूक लढवली आहे का?  त्यांनी एका तरी विधानसभेत निवडणूक लढवून दाखवावी.  अमित शाहांनी 11 निवडणुका लढल्या आहेत, प्रत्येक निवडणुका ते जिंकलेत. अमित शाह कुठे आणि संजय राऊत कुठे? असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

पवार साहेबांना उशिरा कळलं

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, संजय राऊत पवार साहेबांना एकट्यात भेटले नसतील. पवार साहेब त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजावतील. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा नक्कीच एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं, याचं सर्टिफिकेट शरद पवार देत आहेत, हे त्यांना पटत नसेल. मी शरद पवार यांचे अभिनंदन करतो, त्यांनी योग्य निवड केली. उद्धव ठाकरे दोनच दिवस मंत्रालयात आले, मात्र एकनाथ शिंदे सलग काम करत होते. शरद पवार यांना देखील वाटतं शिंदे उत्कृष्ट मंत्री आहेत. मात्र, पवार साहेबांना उशिरा कळलं, असेही त्यांनी म्हटले.

90 घेऊन कधी युती टिकते का?

आम्ही लोकसभेच्या पराभवातून शिकलो आणि विधानसभा जिंकलो.  महाविकास आघाडीने 90-90-90 घेऊन युती केली होती. 90 घेऊन कधी युती टिकते का? नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी 90 घेतली, त्यामुळे त्यांची युती टिकली नाही, आमची टिकली. आम्ही जनतेत गेलो, दौरे केले, प्रत्येक विधानसभेत आमचे कार्यकर्ते होते. तुम्ही काही या पिसाळलेल्या माणसाच्या मागे लागू ना, असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

https://www.youtube.com/watch?v=W-hgnhd8n6s

आणखी वाचा

‘ती’ संजय राऊत स्टाईल, मात्र पवार साहेबांनी स्टेट्समनशीपचं उत्तम उदाहरण घालून दिलं, खासदार संजय राऊतांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर

अधिक पाहा..

Comments are closed.