सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, 1 कोटीच्या खंडणीचा आरोप, नेमकं प्र
सोलापूर बातम्या: संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक प्रदीप शिंगवीसह रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार अशी त्यांची नावे आहेत. तर या प्रकरणतील पीडित महिलेविरोधात सुद्धा एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील एका संस्थेत अधिक्षक पदावर नोकरी लावतो, असे म्हणत आरोपी प्रदीप शिंघवी याने अत्याचार केला. तर संस्थेतल्या दोन महिलांनी पीडितेस धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिल्याचा पीडित महिलेने आरोप केला आहे. मूळची मुंबईची असलेल्या या पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 69 आणि ऍट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने एक कोटीची खंडणी मागितल्याचा उद्योजकाचा आरोप
दरम्यान, पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आलेले होते. मात्र, ती महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती. कामावर पुन्हा घ्या, अन्यथा तुमच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा आरोप शिंगवी यांनी केला आहे. प्रदीप शिंगवी यांच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेविरोधात देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे.
तपास केल्यानंतरच पुढील कारवाई, पोलिसांची माहिती
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केलाय. दोन्ही प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली आहे.
पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीची मुलीसह विहिरीत उडी
दरम्यान, पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यानंतर तिसऱ्याच दिवशी पत्नीने आपल्या चिमुकल्या मुलीसह गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील घाटणे येथे घडली. जनाबाई हरिदास लोंढे (34) आणि तिची मुलगी सातेरी (4) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत. घाटणे गावात राहणारे हरिदास जानू लोंढे (40) यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. पतीचा अंत्यविधी झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी जनाबाई आपल्या मुलीसह बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर गावातील विहिरीमध्ये मायलेकींचे मृतदेह आढळून आले.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.