एकनाथ शिंदेंनी सामंत बंधू-राजन साळवींकडून वचन घेतलं, वाद मिटवून एकाच गाडीने घरी पाठवलं
ठाणे: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे गुरुवारी ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंदाश्रमात शक्तीप्रदर्शन करत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उदय सामंत, किरण सामंत आणि राजन साळवी (Rajan Salvi) यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे (मराठी) यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटवून या दोघांमध्ये समेट घडवून आणला. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती. ही बैठक संपल्यानंतर किरण सामंत (Kiran Samant) आणि राजन साळवी हे एकाच गाडीतून बाहेर पडले. राजन साळवी यांनी या बैठकीनंतर समाधान व्यक्त केले. तर किरण सामंत आणि उदय सामंत (Uday Samant) यांनीही वाद मिटल्याचे संकेत दिले.
राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत. परंतु, मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांना पटकन पक्ष्यांमध्ये घेतील किंवा पक्षांमध्ये एखादी विधान परिषदेची जागा देतील. ही पूर्णपणे अफवा आहे. असे निर्णय घेताना मला आणि उदय सामंत यांना एकनाथ शिंदे नक्कीच विचारात घेतील, अशी मला खात्री आहे, असं किरण सामंत यांनी म्हटले होते. त्यामुळे किरण सामंत यांचा राजन साळवींच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाला विरोध असल्याची चर्चा होतील. परंतु, एकनाथ शिंदे यांनी सामंत बंधू आणि साळवींना समोरासमोर बसवून या वादात यशस्वी तोडगा काढल्याचे तुर्तास दिसत आहे.
बैठकीनंतर राजन साळवी समाधानी
या बैठकीनंतर राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही. जाण्यासाठी निमित्त लागतं, ते आता मिळालं. आजच्या बैठकीत उदय सामंत, किरण सामंत आणि मी एकत्र बसून जिल्ह्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली, मी त्याबाबत समाधानी आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले. आम्हा सर्वांना एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन काम करु. आम्ही एकत्र काम करण्याचे वचन दिले आहे. उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होईल. याबद्दल मी अत्यंत समाधानी असल्याचे साळवी यांनी सांगितले.
सामंत बंधू काय म्हणाले?
या बैठकीनंतर उदय सामंत आणि किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दोन्ही भावांनी सावधपणे प्रतिक्रिया दिली. राजन साळवी हे राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्यासोबत आमची बैठक होती. या बैठकीला किरण सामंत आणि मी उपस्थित होतो. राजन साळवी यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले. तर किरण सामंत यांनी राजन साळवी यांना शिवसेनेत योग्य तो मानसन्मान मिळेल, असे म्हटले. उद्या मोठे शक्तीप्रदर्शन करुन ठाण्यात त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल. आजची बैठक त्यासंदर्भात होती, असे किरण सामंत यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=CJ4AQJt8zks
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.