छावा चित्रपटात शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा आरोप

छावा चित्रपटावरील अमोल मिटकरी: ‘छावा’ चित्रपटातून (Chhaava Movie) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा आणि पराक्रम रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच ‘छावा’ चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू आणि सोयराबाई यांना व्हिलन म्हणून दाखवण्यात आल्याचा प्रयत्न हा चुकीचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवव्याख्याते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलीय. इतिहासात संभाजी महाराजांना शिर्के बंधूंनी पकडून दिल्याचं कुठेही स्पष्ट होत नसल्याचं ते म्हणालेय. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

खरे आणि प्रमाणित चरित्र समोर आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे आणि प्रमाणित चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केलीये. यासंदर्भात इंद्रजीत सावंत, जयसिंगराव पवार आणि शिवचरित्रकार विजयराव देशमुख यांचा समितीत समावेश करावा, अशी ही मागणी आमदार मिटकरींनी केलीये. ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जगात जरी गेलं असलं, तरी त्यात काही बाबी अतिरंजित दाखविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

उलट नीलम गोऱ्हे यांनी आमच्यासारख्या नवोदित आमदारांना..

दरम्यान, लक्षवेधी मांडण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या पैसे घेत असल्याचा आरोप आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होताय. संजय राऊतांच्या या आरोपांवर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतलाय. नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात राऊतांनी लावलेले आरोप खोटे असल्याचं ते म्हणालेय. उलट नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक वेळी आमच्यासारख्या नवोदित आमदारांना जनतेचे प्रश्न प्राधान्य क्रमाने उचलण्यासाठी मार्गदर्शन केल्याचं‌ ते म्हणालेय.

दुकानात पुड्या बांधणाऱ्याला अजित पवारांनी आमदार केलंय –  अमोल मिटकरी

नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सिडीजच्या आरोपांवर बोलताना त्यांनी आपल्या पक्षाचं उदाहरण दिलंय. ठाकरेंच्या पक्षात काय चालतंय हे आपल्याला माहित नाहीय.‌ मात्र माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला अजित पवारांनी एक रुपयाही न घेता आमदार केल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलीय.‌ आपले वडील लोकांकडे सालगडी म्हणून काम करत होते. तर आपण वडिलोपार्जित किराणा दुकानात पुड्या बांधण्याचे काम करीत होतो. अशा व्यक्तीला अजित पवारांनी आमदार केल्याचं‌ ते म्हणालेय.दरम्यान, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यावर टीका होतीये. त्यावर बोलताना आमदार मिटकरी यांनी तो अधिकार गोऱ्हे यांना घटनेने दिल्याचं ते म्हणालेत.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.