मुंबईतील पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकाचे कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरित; अधिसूचना जारी
मुंबई: केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या एकत्रित येणारे मुंबईतील पेटंट (Patents Headquarters in Mumbai) मुख्यालयाच्या महानियंत्रकाचे कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाकडून अधिसूचना ही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडून केंद्र सरकारवर कडाडून टीका करण्यात आली आहे. पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकाचे कार्यालय दिल्लीत हलवल्याचा निर्णय म्हणजे हा मुंबईचे महत्व कमी केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकाचे कार्यालय मागील पन्नास वर्षापासून मुंबईत होते. मात्र ते आता दिल्लीत स्थलांतरित केल्या गेलं आहे. मुंबईतील अँटॉप हिल येथील पेटंट मुख्यालय कार्यालयात मोजकेच अधिकारी कर्मचारी कायम ठेवून महानियंत्रक दिल्लीत जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील (Mumbai) या पेटंट मुख्यालयात दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, अहमदाबाद आणि नागपूर येथील शाखा कार्यालयांचा कारभार नियंत्रित केला जात होता. आता हा कारभार दिल्लीत स्थलांतरित होणारे महानियंत्रक बघतील.
मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी हा निर्णय- आदित्य ठाकरे
दरम्यान, या निर्णयावर भाष्य करतांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून केंद्र सरकारवर कडाडून टीका करण्यात आली आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतून केवळ प्रशासकीय वित्त विभागाचे कामकाज स्थलांतरित केले जात आहे. नव्या नोंदी, व्यापारचिन्ह आणि बौद्धिक संपत्तीची कामे मुंबई कार्यालयातूनच होणार असल्याचं वाणिज्य व उद्योग विभागाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्याप्रकारे स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलंय. मात्र महानियंत्रकाचे पद आणि कार्यालय दिल्लीत स्थलांतरित केली जात असल्याने मुख्यालय स्थलांतरित झाल्यात जमा असल्यास मतं या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.