गृहराज्यमंत्री दिव्य, पुण्यातील गुंडांकडून निवडणुकीत भाजप अन् राष्ट्रवादीला मदत, स्वारगेट प्रक
संजय राऊत: पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यतील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतले आहे. तर बलात्काराच्या प्रकरणावर गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी तरुणीने आरडाओरड, विरोध केलाच नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला, असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता बलात्कार प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का? गृह राज्यमंत्री दिव्य आहेत. शांतपणे बलात्कार पार पडला त्यामुळे बाहेर ज्यांना समजलं नाही, त्यांचं म्हणणं आहे तीने स्ट्रगल केले नाही. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्या पुण्यातच का या सगळ्या गोष्टी घडत आहेत? राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार आहेत. पुण्यातील गुंडांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी काढली होती. इतका मोठा इव्हेंट केला होता, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या आणि अजित पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि धिंड का काढली नाही, असा सवाल त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना विचारला. तर ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली. याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला मदत केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
आम्ही तीन वर्षांपूर्वी शांतीत क्रांती केली. यापेक्षा मोठे राजकीय कथानक मिळू शकेल का? नाटक होईल, चित्रपट होईल, साहित्यिकांनी आमच्याकडे बघावे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता एकनाथ शिंदे हे फार मोठे साहित्यिक, लेखक, कवी, संत आहेत. ते फार मोठे महात्मे आहे. अजून काही त्यांना पदवी द्यायची असेल तर आम्ही त्यांना देऊ. या सगळ्या पदव्या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात. आमदार, खासदार जसे विकत घेतले जातात तसेच कवी, साहित्यिक, लेखक या पदव्या त्यांना हव्या असतील तर ते त्या विकत घेऊ शकतात. त्यांना अमित शाह ज्ञानपीठ पुरस्कार देखील देतील. एवढी मोठी ज्ञानाची पुंजी त्यांच्या जवळ आहे. एकनाथ शिंदे हे जे काही बोलत आहे त्यांचा मराठी भाषेचा स्वाभिमान, इतिहास याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. अफजल खान आणि औरंगजेब यांच्याकडे अशा प्रकारचा पैसा होता तेवढाच तुमच्याकडे आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरतमध्ये इतका पैसा होता की ते या देशाच्या विरोधात मोगलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैसा देत होते. म्हणून छत्रपतींना सुरतची लुट करावी लागली. त्याच सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक जाऊन थांबले होते, असा टोला त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना लगावला.
https://www.youtube.com/watch?v=H7i0wavl1ym
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.