मोठी बातमी : आणखी एका अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, 32 वर्षीय नराधमाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अत्य

लातूर: पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेली घटना ताजी असतानाच आता लातूरमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. बत्तीस वर्षीय नराधमाने आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील धक्कादायक ही घटना आहे. सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. परभणीत दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, त्यानंतर स्वारगेट येथे बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाला, आरोपीचा शोध लागत नाही तोवर त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलगरा या गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. कलम 64 (1) 65 दोन बी एम एस 2023 सह कलम 4, 8, 12 पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे. आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलून घेऊन आरोपीने कुकर्म केले आहे. अल्पवयीन मुलीने घरातील लोकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नराधमाचा शोध सुरू झाला होता. त्यापूर्वीच आरोपी पळून जाण्याची यशस्वी झाला होता. औराद शहाजाणी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

स्वारगेटमध्ये 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार

पुण्यातून गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त, स्थानिक नागरिकांची मदत गाडेला पकडण्यासाठी घेण्यात आली.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.