प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटने
छगन भुजबाल: पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे बलात्कार झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade Arrested) याला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. अशा घटना होणार नाहीत, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पोलिसांनी शासन करायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक माणसांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो. आजकाल काय फोटो काढतात अन् निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्यांनी मारली जाते. फक्त व्हिडिओ काढले जातात, वाचवण्याच्या प्रयत्न कोणी करत नाही. पुण्यातील घटना फारच विचित्र आहे. पुण्याची विद्येचे माहेरघर म्हणून देशात आणि परदेशात मान्यता आहे. पण अशा गोष्टी होणार नाही, यासाठी दक्षता घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करतील
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये बंद पडलेल्या मिलमध्ये जागा मोकळी होती, तेथे अशीच एक घटना घडली. आता सुद्धा तिथे काही बसेस वगैरे बंद अवस्थेत आहे. लाईटची व्यवस्था केली पाहिजे. बंद पडलेल्या बसेस काढल्या पाहिजे. गार्ड सुद्धा ठेवले पाहिजेत. तुमचे गार्ड नसतील तर लोक टायरपासून सगळंच घेऊन जातील. अजिबातच तिथे सिक्युरिटी नसेल तर अशा घटना होतात. आता सुसंस्कृत अशा पुण्यामध्ये अशा घटना घडत आहेत. पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करतील. परंतु समाजाने सुद्धा याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
आपल्या समाजामध्ये अशा गोष्टींना थारा देता कामा नये
दरम्यान, अत्याचाऱ्याला फाशी देणारा शक्ती कायदा महाराष्ट्रात कधी अंमलात आणणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, सगळे मागणी करतात, काहीतरी अडचणी असतील. नवीन कायद्यामध्ये खरोखर किती अंतरभाव आहे तो पण पहावा लागेल. कायदा तर कडक असला पाहिजे. परंतु लोकांनी सुद्धा अशा गोष्टींमध्ये सहज घेता कामा नये. वाचले आणि सोडून दिले एवढे नाही. आपल्या समाजामध्ये अशा गोष्टींना थारा देता कामा नये. ज्या तऱ्हेने काही गोष्टी तेथे सापडल्या, ते पाहता आजच नाही तर कित्येक महिन्यापासून असे व्यवहार तिथे होते. मोकळ्या बसेस आहेत. सिक्युरिटी नाही त्यामुळे तेथे असे घाणेरडे प्रकार होत आहे, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=SLRGDGWMT1E
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.