हे झकी आहे .. तेथे बरेच डावे आहेत, रामदास कदमान ठाकर्णा हावभाव, 'अंकी 7-8 महिन्यांचा मॉन्सर ..'

रत्नागीरी: राज्यात सध्या आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचा धडाका सुरू आहे .यावरून राजकारणाला वेग आलाय .एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे .याच दरम्यान , ‘उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने कोकणातून हद्दपार केले आहे .जवळजवळ सगळा कोकण आता शिवसेनेसोबत आलाय .ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है..’ असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली . (Uddhav Thackeray)

भविष्यात बाळासाहेबांच्या अनेक प्रमुख नेते हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा इशारा रामदास कदम यांनी दिला .आणखी सात-आठ महिने  उद्धव ठाकरेंचे काही आमदार  त्यांच्या पक्षात वाट पाहतील .शेवटी त्यांना देखील त्यांचे मतदारसंघाचा विचार करायला हवा असा सूचक इशाराही त्यांनी दिला .माझं भविष्य असं आहे की ,येत्या काळात उद्धव ठाकरेंच्या पक्षात केवळ हम दो हमारे तीन एवढेच लोक शिल्लक राहतील .अशी कडवी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली . ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते . जेव्हा मोगलांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताची धना दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना सकाळी उठल्यापासून एकनाथ शिंदे दिसतात . असेही ते म्हणाले.

काय म्हणाले रामदास कदम ?

कोकणातूनच नाही पण सबंध महाराष्ट्रात त्यांना हद्दपार करत आहे .कोकणामध्ये त्यांचा फक्त एक आमदार भास्कर जाधव निवडून आलाय .बाकी सगळं कोकण त्यांच्या हातातून गेलाय .कोकण शिवसेनेचाच आहे .भगव्या झेंड्याचा आहे .बाळासाहेबांचा आहे .आता कोकणाने उद्धव ठाकरे यांना हद्दपार केला आहे .भविष्यात महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे हद्दपार होतील यावर आमचा विश्वास आहे . गंगेमध्ये अनेक लोक गेलेत .अनेकांनी डुबक्या मारल्यात . त्या सगळ्यांनी पाप केलं होतं का?ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते .मोगलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या घोड्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धना दिसायचे . आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे दिसतात अशी टीका रामदास कदम यांनी केली .

https://www.youtube.com/watch?v=Clzstdfluly

हेही वाचा:

Ajit Pawar : अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..

Comments are closed.