सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ, चांदी देखील महागली MCX वर सोन्याचे दर कुठंपर्यंत पोहोचले?
आज सोन्याचे चांदीची किंमत मुंबई : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु असताना सोन्याचे आणि चांदीच्या दरात तेजी सुरु आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दोन्हींच्या एप्रिलच्या वायद्यामध्ये तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचे दर 84550 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. चांदीच्या वायद्याचे एक किलोचे दर 94750 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे आणि चांदीचे दर वाढत आहेत.
सोन्याचे वायद्याच्या दराची सुरुवात तेजीसह झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिलच्या वायद्याचे सुरुवातीचे दर 292 रुपयांच्या तेजीसह 84511 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर यामध्ये आणखी वाढ झाली. 343 रुपयांनी दर वाढून 84562 रुपयांवर पोहोचला होता. 24 कॅरेट सोन्याचे दर 84623 रुपयांच्या उच्चांकापर्यंत जाऊन आले. तर, सोन्याचा निचांकी दर 84511 रुपयांवर पोहोचला.
चांदीच्या वायद्याच्या दरात देखील तेजी सुरु आहे. मल्टी कमोडिची एक्सचेंजवर मार्चच्या वायद्याच्या दरात 272 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दराच्या वायद्याची सुरुवात 94600 रुपयांवरुन झाली होती. त्यानंतर त्यामध्ये तीज पाहायला मिळाली. दरम्यानच्या काळात एक किलो चांदीचे दर 94762 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या वर्षी चांदीच्या दरानं 100081 रुपयांचा टप्पा गाठला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. कॉमेक्सवर सोन्याचे दर 2872 डॉलर प्रति औस वर होते. कॉमेक्सवर 30.70 डॉलर्सची तेजी पाहायला मिळाली, त्यामुळं सोन्याचे दर 2879.20 वर पोहोचले होते. कॉमेक्सवर चांदीच्या वायद्याचे दर 31.71 डॉलर्सच्या तेजीसह 31.89 डॉलर्स प्रति औसवर आहे.
शुक्रवारी सोन्याच्या दरात 1 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेत महागाईचे आकडे अंदाजाप्रमाणं आल्यानंतर डॉलरची किंमत उच्चांकावर पोहोचली होती. फेडरल रिझर्व्ह अतिरिक्त दरात कपातीबाबत कठोर भूमिका घेऊ शकते. त्यामुळं सोन्याच्या दरात शुक्रवारी घसरण झाली होती.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन नुसार 28 फेब्रुवारीला 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 85060 रुपये इतका होता.
दरम्यान, निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी 50 मध्ये 20 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये देखील तेजी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज व्यवहार सुरु झाले तेव्हा त्यामध्ये तेजी होती. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली, त्यानंतर त्यामध्ये घसरण झाली होती. मात्र, पुन्हा एकदा बाजार सावरला.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.