पंकजा मुंडेंना बीडचं सोयरंसुतक राहिलेलं नाही, सुरेश धसांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला
मुंबई: काही दिवसांपूर्वी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मला तुम्ही सारखे बीड जिल्ह्याचे प्रश्न का विचारता, मी आता पुण्यात आले तर पुण्याबद्दल विचारा’, अशी तंबी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टोला लगावला. पंकजा मुंडे या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना जागतिक परिस्थितीबाबतचे प्रश्न विचारा, असे सुरेश धस यांनी म्हटले.
माझी मीडियाला नम्र विनंती आहे की, आमच्या पंकजाताईंना राज्य सरकारने पर्यावरण विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण देशात आणि जगात पर्यावरणाचे प्रश्न बघावे लागतात. त्यामुळे तु्म्ही पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारत जाऊ नका. कारण त्यांना बीड बीड जिल्ह्याबद्दल सोयरंसुतक राहिलेलं नाही. इथून पुढे तुम्ही त्यांना डोनाल्ड ट्रम्प, बायडन, पुतीन, गाझा पट्टी, डेन्मार्क जर्मनी या देशांतील हवामानाचे प्रश्न विचारत जा. बीड जिल्ह्यात इतकी दुर्दैवी घटना घडली आहे. माझी पंकजा मुंडे यांना विनंती आहे की, आतातरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून या. संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख हे दोघे भाऊ भाजपचे बुथप्रमुख होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपच्या बुथवर काम केले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून किमान आपल्या बुथप्रमुखाच्या बाबतीत असंवेदेशनली वक्तव्य होईल असं वाटलं नव्हतं, असे सुरेश धस यांनी म्हटले. पंकजा मुंडे म्हणतात की, बीड जिल्ह्याचे प्रश्न काय विचारता पुण्याचे विचारा. त्याच्यापेक्षा त्यांना बीड जिल्हा काय, राज्य आणि देशपातळीवरचे प्रश्नही विचारु नका. त्या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झाल्या आहेत. त्यांना तेच प्रश्न विचारा, असे सुरेश धस यांनी म्हटले.
पंकजा मुंडे नेमंक काय म्हणाल्या होत्या?
पंकजा मुंडे या काही दिवसांपूर्वी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राविषयी विचारण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांवर संतापल्या होत्या. दोषारोपपत्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी पुण्यात आहे. पुण्याचे प्रश्न विचारा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.
संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येता मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. माझ्याकडे गृहखाते नाही. गृहखाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत. दोषींवर नक्की कारवाई होईल. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलदगतीने चौकशी झाली पाहिजे. आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.
https://www.youtube.com/watch?v=jbvunbkjmzm
आणखी वाचा
शूज म्हणाले, देवेंद्र फड्नाविस बहुबली, मी शिवगामी, मेरावन ओसीई आहे
अधिक पाहा..
Comments are closed.