पुण्यातील यवतमध्ये घरावर चड्डी-बनियानवर जाऊन दरोडा, तरुण मुलाला वार संपवलं; तिघांवर वार केले अन
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. यवतमधील रेल्वे स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री दरोडा पडला आहे. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे, तर चव्हाण दांपत्य आणि घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी पोहचले असून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चव्हाण कुटूंब राहते, त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे, तर चव्हाण दांपत्य आणि घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर या घटनेने सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
दौंड तालुक्यातील यवत रेल्वे लाईन जवळ घरात घुसून दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत. मध्यरात्री तीन जणांनी चव्हाण कुटुंबीयांच्या घरामध्ये शिरकाव करत चव्हाण कुटुंबीयांना मारहाण केली. हे तीन इसम बनियान आणि चड्डी घालून चव्हाण यांच्या घरात घुसले होते. हे इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. परंतु हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांना आहे. त्यादृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत. जखमींपैकी तीन जण जखमी आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस तिन्ही शक्यतांचा आधार घेऊन तपास करीत आहेत. हल्ला केलेल्या तिघांचा शोध पोलीस घेत आहेत, तसेच गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस ठाण्यात सुरू आहे. जखमींवरती लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
नाशिकच्या देवळा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत 5 घरे लुटल्याची माहिती समोर आली आहे, रोख रक्कम, सोने- चांदीच्या दागिन्यांची चोरी देखील करण्यात आली आहे, नाशिकच्या देवळा शहरातील ज्ञानेश्वरनगर, गुंजाळनगर, तालुक्यात खुंटेवाडीसह परिसरातील बंद असलेली घरे चोरट्यांनी फोडली असून मध्य रात्रीच्या सुमारास या चोरट्यांनी बंद असलेल्या या घरांची लूट केली आहे, त्यांनी सोन्याचे दागिने, वस्तू व रोकड मिळून 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.
अधिक पाहा..
Comments are closed.