नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला ‘तो’ कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस

कृष्णा अंदले: बीड (Beed) येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी बुधवारी (दि. 13) केला होता. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी म्हटलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. मात्र दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर सीसीटीव्हीत दिसलेला तो तरुण कृष्णा आंधळे असल्याचा पुरावा नाशिक पोलिसांना सापडलेला नाही. आतापर्यंत नाशिकच्या अनेक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. यानंतर नाशिक पोलिसांकडून विविध पथके तैनात करून कृष्णा आंधळेचा शोध सुरु आहे.

‘तो’ कृष्णा आंधळे की दुसरा कोणी?

स्थानिकांनी कृष्णा आंधळे हा मोटारसायकलवर मखमलाबादच्या दिशेने गेल्याचे सांगितले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार पोलस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम बुधवारपासून करत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. तसेच गंगापूरच्या ग्रामीण हद्दीत पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे. स्थानिकांनी दावा केलेले तरुण मोटरसायकलवर जाताना दिसत आहेत. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही. या मोटारसायकलवर दिसलेला तरुण हा कृष्णा आंधळे आहे की नाही, याबाबत अजून स्पष्टता झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले होते?

याबाबत प्रत्यक्षदर्शी वकील गीतेश बनकर यांनी म्हटले आहे की, सहदेवनगर येथे मी वास्तव्यास आहे. सकाळी मी घरातून निघालो आणि दत्त मंदिरापाशी आलो, तेव्हा एका झाडाच्या इथे दोन जण मला दिसले. ते त्यावेळी मास्क घालत होते. यानंतर कृष्णा आंधळे याने जेव्हा त्याचा मास्क खाली घेतला. तेव्हा मी त्याला ओळखले आणि तात्काळ गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला. मी बघितलेली व्यक्ती कृष्णा आंधळेच होती. तो आता मखमलाबादच्या दिशेने गेला आहे. दोन जण मोटरसायकलवर होते, असे त्यांनी म्हटले होते. तर नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकल वरून तो पळून गेल्याचा दावा देखील स्थानिकांनी केलाय.

https://www.youtube.com/watch?v=bcbrg0kttn8

आणखी वाचा

Satish Bhosale : ट्रॅव्हल्सने पोहोचला प्रयागराजला, सोबत होती एक पिशवी अन्…; ‘असा’ होता खोक्याचा पुढचा प्लॅन

अधिक पाहा..

Comments are closed.