खोक्या उर्फ सतीश भोसलेला राज्यात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड

सतीश भोसाले: भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला काल प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचा ट्रांझीट रिमांड बीड पोलिसांना आज मिळाला आहे. त्यामुळं खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रांझीट रिमांड मिळाल्याने बीड पोलिसांना खोक्याचा ताबा मिळाला आहे.

नेमका कसा गेला होता प्रयागराजला?

आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत खोक्याला बीडमध्ये आणले जाणार आहे. 48 तासात त्याला न्यायालयात हजर करावे लागणार आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले सहा दिवस कुठे होता? तो कसा पळाला आणि कुठे कुठे राहिला? याची माहिती एबीपी माझाकडे आली आहे. खोक्याला काल प्रयागराजमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्याने त्याच्या घरातून पळ काढला आणि पुणे गाठलं. तो पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहिला. तिसऱ्या दिवशी त्याने शिरूर कासार या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं, तिथे एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर संभाजीनगर गाठलं आणि तिथूनच त्याने प्रयागराजसाठी बस पकडली होती अशी माहिती समोर आली आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने राहते गाव सोडलं. त्याने थेट पुणे गाठलं. पुण्यामध्ये त्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवस मुक्काम केला. त्याने हॉटेल देखील वेगवेगळे केले होते. पुढे तो माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी शिरूर कासार या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने अहिल्यानगर गाठलं. त्याने अहिल्यानगरमध्ये देखील एक दिवसाचा मुक्काम केला, त्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला. तिथून त्याने ट्रॅव्हल्स पकडली आणि तिकडून तो उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे पोहोचला.

महत्वाच्या बातम्या:

Satish Bhosale : खोक्या उर्फ सतीश भोसले 6 दिवस कुठे होता? कसा पळाला? कुठे राहिला? पुणे-शिरूर-अहिल्यानगर-संभाजीनगर अन् शेवटी गाठलं प्रयागराज, पोलिसांनी असं घेतलं जाळ्यात

अधिक पाहा..

Comments are closed.