एकनाथ शिंदे-अजित पवार दोघे एकाचवेळी मुख्यमंत्री होणार? काँग्रेसच्या गोटातून थेट ऑफर
मुंबई: राज्याच्या राजकारणात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देखील नेत्यांचं पक्षांतर होताना दिसत आहेत. त्याचबरोबर नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत, अशातच आज होळीच्या सणा दिवशी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तथा दोन पक्षांच्या प्रमुखांना काँग्रेसच्या नेत्यांने आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले म्हणाले, “अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचे काम भाजपने केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
अजितदादा अन् शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची आस
“आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना पाठिंबा देऊ. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. भाजपच्या अधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू, म्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान नाना पटोले यांनी दिलेल्या या ऑफरवरती भाजपवर केलेल्या टीकेवर भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. पटोलेंच्या या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत.
पटोलेंच्या ऑफरवर बच्चू कडुंची प्रतिक्रिया
नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद असल्याचं प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. “नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद आहे. काँग्रेस स्थित आहे की नाही? हे समजत नाही. रवींद्र धंगेकर आताच शिवसेना शिंदे गटात गेले. काँग्रेस कुठे आहे, हे शोधले पाहिजे. जोपर्यंत केंद्रात भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत नेते कुठेही जाणार नाहीत. तेथील ईडीचे फटके याची सगळ्यांना भीती आहे. केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्यांच्या अंगावर पडणार आहे. त्यामुळे हे धाडस कुणीच करणार नाही,” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.