नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, एकनाथ शिंदे अजित पवारांना दिलेल्या ऑफरवरून राऊतांचा निशाणा
संजय राऊत: नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं .. जरा थांबायला हवं होतं असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावलाय. नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या ऑफरवर यावर मी काय बोलू माझी वाचाच गेली, असेही राऊत म्हणाले. धुळवडीदिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. शिंदे आणि पवार यांनी आमच्यासोबत यावे दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री करू असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले संजय राऊत ?
‘नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत .काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत .विधान परिषदेचा अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलंय .राजकारणात काहीही अशक्य नसतं .2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल असं कुणाला वाटलं होतं का ?त्यानंतर अडीच वर्षांनी अर्धमृद्ध घटनाबाह्य सरकार येईल असं वाटलं होतं का ?त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा सरकार येईल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का ?राजकारणात सर्व शक्यता असतात .त्याचा सकारात्मक विचार करायला हवा .नाना पटोले मी खरच अशी ऑफर दिली असेल आणि ती ऑफर कोणी स्वीकारली असेल तर नाना पटोले यांच्याशी आम्ही चर्चा करू’ असेही संजय राऊत म्हणाले .
‘ज्या घडामोडी आम्ही पडद मागे पाहतोय जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसतात. नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं .जरा थांबायला पाहिजे होतं .साधारण वर्षभराने महाराष्ट्राचा राजकारण बदलणार आहे त्यामुळे थोडं थांबा असं सूचकपणे राऊत म्हणाले .एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काहीही संबंध नाही हे भाजपच्या ताटाखालचे मांजर आहे .सगळे झेंडे भाजपचे आहेत .तुम्ही भगव्या झेंड्याची चिंता करू नये .असा टोलाही संजय राऊतांनी लगावला . नाना पटोले यांनी जी ऑफर दिली आहे त्यात सुधीर मुनगंटीवार आहेत का.. हे एकदा चेक करा’ असेही संजय राऊत म्हणाले .
जयंत पाटलांचा सगळं चांगलं चाललंय
गेल्या काही दिवसांपासून शक्तिपीठ मार्ग रद्द करा यासाठी काढलेल्या मोर्चात माझं काही खरं नाही या वक्तव्याची मोठी चर्चा झाली .यावर जयंत पाटलांचा सगळं चांगलं चाललं आहे असं संजय राऊत म्हणाले .राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते आहेत .शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी आले .आमचे जे सहकारी आहेत .जयंत पाटलांसंदर्भात कोणत्याही अफवा पसरवू नका .संजय राऊत म्हणाले .
https://www.youtube.com/watch?v=bpmufoljqey
हेही वाचा:
Sharad Pawar: शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; कौतुक, आभार आणि पत्रातून केली ‘ही’ मागणी
अधिक पाहा..
Comments are closed.