बीडच्या गुंडाराजचा आणखी एक बळी, ट्रकमालकाने ड्रायव्हरला दोन दिवस कोंडलं, बेदम मारहाणीत तरुणाचा

बीड गुन्हा:बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बीडमध्ये राखेतून चाललेली गुंडगिरी, दहशत, मारहाणीच्या घटना गुन्हेगारीचा केंद्रबिंदू झालेल्या असताना बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे . बीडमध्ये आष्टी तालुक्यात ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे .या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय . सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी व्यक्त केलाय .

गेल्या अनेक दिवसांपासून एकच प्रश्न सातत्याने विचारला जातोय, बीडमध्ये नक्की चाललंय काय? बीडमध्ये गुन्हेगारी घटनांनी अक्षरश: कळस गाठला आहे.  आष्टीमध्ये ट्रकमालकाने चालकाला दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केली असून या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाल्याने बीड सून्न झालंय. तसेच बीडच्या एका शिक्षकाने फेसबूक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटनाही घडलीय.

नक्की घडले काय?

बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रक मालकाने चालकाला दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे .ही मारहाण इतकी गंभीर होती की त्यात चालकाचा मृत्यू झाला आहे .याप्रकरणी आष्टी पोलिसांनी ट्रक मालकाला ताब्यात घेतल्या असून विकास बनसोडे हा पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर नावाच्या व्यक्तीचा कव्हर चालक म्हणून कामाला होता .त्यांच्यात वाद झाल्याने एक क्षीरसागर याने त्याला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याचा आरोप विकासचा भाऊ आकाश बनसोडे यांनी केलाय .या प्रकरणात आष्टी पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतले आहे.या घटनेचा अधिक तपास सुरू असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आष्टी पोलिसांनी सांगितले .

हेही वाचा:

https://www.youtube.com/watch?v=zzv0luth1nq

अधिक पाहा..

Comments are closed.